Advertisement

ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांचा गोळीबारात मृत्यू

दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांचा गोळीबारात मृत्यू
SHARES

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर (Abhishek Ghosalkar) झालेल्या गोळीबारात (Dahisar Firing Incident) त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गोळीबार केलेल्या व्यक्तीने स्वतःलाही गोळी मारुन संपवलं.

बोरिवलीतील पश्चिममधील प्रभू उद्योग भवन कार्यालयात अभिषेक यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पैश्याचा वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येतेय.

अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकरांचे पुत्र आहेत. मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तिकडून अभिषेक घोसाळकरांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकरांच्या शरिरात घुसल्या होत्या.

मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता. 

मॉरिस नावाच्या व्यक्तीने घोसाळकरांना त्याच्या कार्यालयात बोलावलं होतं. त्यानंतर या दोघांनीही फेसबुक लाईव्ह केलं आणि यापुढे एकत्र काम करण्याचं ठरवलं. शेवटच्या क्षणी मॉरिस नोरवा हा व्हिडीओतून बाजूला झाला आणि त्याने समोरून गोळीबार केला. त्यात अभिषेक घोसाळकर यांची प्रकृती गंभीर होती. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा