घाटकोपरमध्ये उद्धव ठाकरेंची शाखा वारी

 Ghatkopar
घाटकोपरमध्ये उद्धव ठाकरेंची शाखा वारी
घाटकोपरमध्ये उद्धव ठाकरेंची शाखा वारी
See all
Ghatkopar, Mumbai  -  

घाटकोपर – महानगरपालिकेत पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवण्याच्या तयारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लागलेत. त्याची सुरुवात बुधवारी घाटकोपर पश्चिममधील 123, 124, 126, 127, 128, 129 आणि 130 या शाखांना भेटी देत त्यांनी केली. यावेळी आदेश बांदेकर, विभाग प्रमुख राजेंद्र राऊत, उपविभाग प्रमुख सुरेश पाटील, सुभाष पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. 128 प्रभागाचे नगसेवक दीपक हांडे आणि 129 प्रभागाच्या नगसेविका अश्विनी मते देखील यावेळी हजर होत्या. उद्धव ठाकरे यांनी नवीन प्रभाग रचनेचा आढावाही यावेळी घेतला. याबरोबर उद्धव ठाकरे यांनी विभागातील सध्याच्या घडामोडींची सुद्धा माहिती जाणून घेतली.

Loading Comments