Advertisement

भाजपच्या गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार

पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये झालेला गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद

भाजपच्या गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार
SHARES

उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime)  भाजप आमदार (BJP)  गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार  झालाय.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.  

काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओही समोर आला आहे.  गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळत आहे. 

उल्हासनगर गोळीबारातील जखमी दोघांपैकी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तर त्यांचा सहकारी राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.  

श्रीकांत शिंदे भेटल्यानंतर महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची माहिती दिली. महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर आहे. महेश गायकवाड यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

सहा गोळ्या शरीरातून बाहेर काढल्या परंतु जखम गंभीर आहे. तर राहुल पाटील रूग्ण  यांच्यावर रात्री तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  सध्या अतिदक्षता विभागात आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

दरम्यान ही सगळी घटना वैयक्तिक वादातून झाली असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

राजकीय वाद या स्तरावर येणं योग्य नाही. या घटनेचा पक्षाशी काही एक संबंध नाही. वैयक्तिक वादातून सगळा प्रकार झल्याचे  नरेश म्हस्के म्हणाले.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा