Advertisement

‘तुम्ही माझं काही करू शकणार नाही’, राणेंचं शिवसेनेला खुलं आव्हान

शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचं कुणी नव्हतं. अपशब्द बोलणारे पण नव्हते. कुठे काय करत होते माहिती नाही.

‘तुम्ही माझं काही करू शकणार नाही’, राणेंचं शिवसेनेला खुलं आव्हान
SHARES

आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे करायचं आहे ते केलं. तुम्हाला घरं नाहीत? मुलंबाळं नाहीत?? लक्षात ठेवा. तुम्ही कुणी माझं काही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत मी पुरून उरलोय. शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचं कुणी नव्हतं. अपशब्द बोलणारे पण नव्हते. कुठे काय करत होते माहिती नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव न घेता आव्हान दिलं.

नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलास दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, माझ्याविरोधात जे जे गुन्हे दाखल झाले होते, त्याबाबत निकाल लागलेला आहे. दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागलेले आहेत. याचा अर्थ देश कायद्याने चालतो आहे हे सिद्ध झालं आहे. मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो. असा प्रश्न विचारताना ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर आहे, असं राणे म्हणाले.

हेही वाचा- झिशान सिद्दीकी बनले मुंबई युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष

भाजप नेते प्रसाद लाड यांनी महिलांवर हात टाकाल तर आम्ही प्रत्युत्तर देऊ, असा शिवसेना भवनाचा उल्लेख करत म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?... महाशय काय बोलले, महाशय हे मी चांगल्या अर्थाने बोलत आहे... सेना भवनबाबत अशी कोण भाषा करेल त्याचे थोबाड तोडा हे त्यांनी आदेश दिले, हा गुन्हा नाही? दुसरे वाक्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबाबत. ते म्हणाले, हा योगी आहे की ढोंगी, चपलाने मारलं पाहिजे. एका मुख्यमंत्र्याला चपलेने मारले पाहिजे. ते ही मुख्यमंत्री आहेत. हे योग्य आहे का?असे मुद्दे नारायण राणे यांनी उपस्थित केले.

माननीय शरद पवार साहेब काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं करणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं. तर त्यांनी चुकीचं केलं असं मला नाही वाटत. काय भाषा आहे. आम्ही तर राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो. कोणी यापुढे असं बोलू नये म्हणून आम्ही बोललो, असं राणे पवारांना उद्देशून म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा