Advertisement

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवरुन याची माहिती दिली.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवरुन याची माहिती दिली.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, 'एखादी घोषणा करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यामुळे मी सोप्या पद्धतीनं सांगते की मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली चाचणी करुन घ्यावी.'

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या बिहार निवडणुकीच्या प्रचारातील भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारक आहेत. त्या मोठ्या उत्साहाने बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करत होत्या. मात्र, त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यांना प्रचारापासून दूर राहावे लागणार आहे. 

बिहारमधील उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी यांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्मृती इराणीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रसाद, नितीन गडकरी, कृष्णपाल गुर्जर, श्रीपद नाईक, अर्जुन राम मेघवाल, गर्जेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी मंत्र्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा