Advertisement

'स्वराज्य फाऊंडेशनचा' अनोखा उपक्रम


'स्वराज्य फाऊंडेशनचा' अनोखा उपक्रम
SHARES

काळाचौकी - काळाचौकी येथील 'स्वराज्य फाऊंडेशन'च्या वतीनं 15 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 'माणूसकीची भिंत' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमात नागरिकांनी आपल्या घरात असलेल्या मात्र उपयोगात नसलेल्या वस्तू घरात न ठेवता या उपक्रमासाठी दान कराव्यात, असे आवाहन स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीनं करण्यात आलंय. या उपक्रमाचे उदघाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलंय. काळाचौकी - अभ्यूदयनगर येथील ललित कला भवन समोर बिल्डिंग क्रमांक 5 येथे हा उपक्रम सुरु करण्यात आलाय. या कार्यक्रमाला येणार्‍या नागरिकांनी त्यांच्याकडे असलेले जुने कपडे, चपला, बूट, स्वेटर, जुनी भांडी, व अन्य वस्तू या उपक्रमात दान करायच्या आहेत. यासाठी एका भिंतीला खिळे ठोकण्यात आले असून, नागरिकांनी आणलेल्या वस्तू या खिळ्यांना टांगून जायच्या आहेत. नागरिकांनी जमा केलेल्या वस्तूंची नोंद एका रजिस्टरमध्ये करण्यात येणार आहे. तसेच एकूण गोळा झालेल्या वस्तूंचे वितरण कोणाला करण्यात आले याची देखील नोंद या रजिस्टरमध्ये असणार आहे. या उपक्रमात एका व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार दोन वस्तू देण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे या उपक्रमानंतर जर काही वस्तू शिल्लक राहिल्याच तर त्या वस्तू वाडा, मोखाडासारख्या आदीवासी पाड्यात जाऊन वाटण्यात येणार असल्याची माहिती स्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय पवार यांनी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा