कारची तोडफोड

 Chembur
कारची तोडफोड
कारची तोडफोड
See all

चेंबूर - वाशी नाका परिसरात राहणारे गणेश पाटील यांच्या कारची अज्ञात इसमानं रविवारी पहाटे तोडफोड केल्याचं समोर आलंय. पाटील हे मनसेचे पदाधिकारी आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांना अज्ञात इसमानं फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रविवारी पहाटे त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. पोलिसांनी लवकर कारवाई केली नाही तर पोलीस ठाण्यासमोरच उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

Loading Comments