Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

योगींच्या येण्याने उद्धव ठाकरेंची झोप उडालीय, कॅबिनेट मंत्र्यांचा पलटवार

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही योगींवर हल्ला चढवण्यात आलाय. यामुळे संतप्त झालेले योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री एस. एन. सिंह यांनी शिवसेनेवर पलटवार केलाय.

योगींच्या येण्याने उद्धव ठाकरेंची झोप उडालीय, कॅबिनेट मंत्र्यांचा पलटवार
SHARES

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रातील उद्योजक आणि बाॅलिवूड निर्मात्यांसोबत भेटीगाठी करण्यासाठी मुंबईत आले आहेत. त्यावरून सध्या योगींवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. शिवसेनेचं (shiv sena) मुखपत्र असलेल्या सामनातूनही योगींवर हल्ला चढवण्यात आलाय. यामुळे संतप्त झालेले योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री एस. एन. सिंह यांनी शिवसेनेवर पलटवार केलाय.

शिवसेनेच्या टीकेवर वृत्तसंस्थेशी बोलताना एस. एन. सिंह म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची झोप उडाली आहे. सामनातील संपादकीयच्या माध्यमातून ते आक्षेपार्ह भाषेचा वापर करत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो. कदाचित हीच त्यांच्या पक्षाची संस्कृती आहे. याउलट बाॅलिवूडमधील लोकांनी आमचं मनापासून स्वागतच केलं.

हेही वाचा- कायदा-सुव्यवस्था राखा, मायानगरी आपोआप निर्माण होईल, शिवसेनेचा योगींना टोला

शिवसेनेने उगाच इतरांवर बोटं ठेवू नयेत. त्याऐवजी त्यांनी सर्वप्रथम बाॅलिवूडसोबतची आपली संस्कृती सुधारली पाहिजे. त्यांना चित्रपटसृष्टीसाठी काही करायचं आहे, तर त्यांनी ते करत रहावं. कुणीही त्यांचं काहीही हिरावून घेणार नाहीय. ही सगळी निकोप स्पर्धा आहे, असा सल्ला देखील एस. एन. सिंह यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिला.

सामानातील अग्रलेखातून योगी आदित्यनाथ यांचे कान टोचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. लखनौ, कानपूर, मेरठ अशा शहरांतील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करीअर करण्यासाठी वर्षानुवर्षे मुंबईतच येत आहेत. योगी या सगळय़ांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का? योगी जिद्दीला उतरले आहेत व त्यांनी फिल्म सिटीचे मनावर घेतलं आहे. 

योगी महोदयांनी आता खुलासा केला आहे की, आम्ही काही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवीत आहोत. कोण उत्तम सुरक्षा आणि सुविधा देईल अशी ही स्पर्धा आहे. योगींचा हा विचार चांगलाच आहे. तुम्ही फिल्म सिटी खुशाल उभारा, पण त्यांच्या याच विधानात ‘फिल्म सिटी मुंबईतच (mumbai) का फोफावली, वाढली, बहरली आणि बाहेर का नाही?’ याचे उत्तर दडलं आहे. शिवाय फिल्म सिटीच कशाला, मुंबईसारखे रोजगारनिर्मितीचे केंद्र आणि देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणारं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहरही योगींनी उभारायला काहीच हरकत नाही, असं सामानात म्हटलं आहे.

(up cabinet minister sn singh slams shiv sena chief uddhav thackeray over yogi adityanath and film city issue)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा