Advertisement

भाजपाला घाबरणार नाही - उर्मिला मातोंडकर

मी भाजपाला घाबरणार नाही. भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाविरोधात बोलतच राहणार, असा निर्धार काँग्रेसच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाला घाबरणार नाही -  उर्मिला मातोंडकर
SHARES

सत्तेत आल्यापासून भाजपाने द्वेषाचं राजकारण केलं. भाजपाच्या या द्वेषाच्या राजकारणाचा मलाही फटका बसला आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्यावर टीका करण्यात आली. मात्र, मी भाजपाला घाबरणार नाही. भाजपाच्या  द्वेषाच्या राजकारणाविरोधात बोलतच राहणार, असा निर्धार काँग्रेसच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केला आहे. 


द्वेषाला थारा नाही

मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर यांनी भाजपाला सडेतोड उत्तर दिले. त्यावेळी त्या म्हणाल्या, भाजपाने ५ वर्षात जेवढा पैसा जाहिरातींवर खर्च केला तेवढा पैसा विकासकामांवर खर्च केला असता तर देशाचं भलं झालं असतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा गांधींच्या या भूमीत द्वेषाला थारा नाही. माझा सत्यावर पूर्ण विश्वास असून मी भाजपाच्या या द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढत राहीन, असंही निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.


राज ठाकरेंचे आभार मानले

उर्मिला यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. राज यांनी  घेतलेली भूमिका व्यापक आहे. . मी जशी मराठी आहे, तशीच मी प्रथम भारतीयही आहे. माझ्या मतदारसंघात छोटा भारत राहतो. तिथे सर्व जाती-धर्माचे आणि भाषेचे लोक राहतात. मुंबईत वर्षानुवर्ष राहणारे हे लोक माझ्यासाठी मुंबईकरच आहेत, असंही यावेळी उर्मिला यांनी स्पष्ट केलं.  




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा