Advertisement

उर्मिलाने चालवली रिक्षा, गोराईतील रिक्षा चालकांना केलं खूश

काँग्रेसच्या आॅफिसमध्ये जाण्याअगोदर उर्मिलाने रिक्षा चालकांची भेट घेण्याचं ठरवलं. त्यानुसार एका रिक्षा स्टँडवर जाऊन उर्मिलाने तिथल्या रिक्षा चालकांशी संवाद साधला आणि मत देण्याची विनंती केली. एवढंच नाही, तर रिक्षात बसून तिने त्यांच्यासोबत फोटोही काढले.

उर्मिलाने चालवली रिक्षा, गोराईतील रिक्षा चालकांना केलं खूश
SHARES

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पूर्णपणे राजकीय रंगात रंगलेली दिसून येत आहे. उर्मिला रविवारी बोरीवलीतील गोराई परिसरात चक्क रिक्षा चालवताना दिसली. रिक्षावाल्यांची मतं खेचण्यासाठी तिने ही शक्कल लढवली.


तगडी टक्कर

उर्मिला उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवत आहे. तिच्या विरोधात भाजपाचे तगडे उमेदवार गोपाळ शेट्टी आहेत. गोपाळ शेट्टी यांनी २०१४ मध्ये मोठ्या मताधिक्याने काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम यांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा काँग्रेसने या जागेवर लोकप्रिय चेहरा उतरवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उर्मिला काँग्रेसच्या गळाला लागली.


चर्चेतला चेहरा

सध्या सर्वच प्रसार माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियात उर्मिलाच्या उमेदवारीची चर्चा आहे. उर्मिला जिथं जाईल, तिथं गर्दी खेचून घेत आहे. अशीच गर्दी रविवारी गोराईत बघायला मिळाली. काँग्रेसच्या आॅफिसमध्ये जाण्याअगोदर उर्मिलाने रिक्षा चालकांची भेट घेण्याचं ठरवलं. त्यानुसार एका रिक्षा स्टँडवर जाऊन उर्मिलाने तिथल्या रिक्षा चालकांशी संवाद साधला आणि मत देण्याची विनंती केली. एवढंच नाही, तर रिक्षात बसून तिने त्यांच्यासोबत फोटोही काढले.हेही वाचा-

उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात; गोपाळ शेट्टींविरोधात रंगणार सामना

मी निवडणूक लढवणार ‘ही’ तर निव्वळ अफवा- माधुरी दीक्षितRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा