Advertisement

अपघात टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरा- दीपक केसरकर


अपघात टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरा- दीपक केसरकर
SHARES

द्रुतगती महामार्गांवर वाहतूक नियंत्रण आणि अपघात टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित साधनांचा वापर करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिले. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी तसेच महामार्गांची सुरक्षा व उपाययोजना करण्यासंदर्भात मंत्रालयात केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव रजनिश सेठ, महामार्ग सुरक्षा अपर पोलीस महासंचालक जयजीत सिंग व एम.एस.आर.डी चे अधिकारी धोटे आदी उपस्थित होते.


ड्रोनचा वापर करा

महामार्गावरील अपघात टाळता येऊ शकतात अथवा त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करावा. नव्या तंत्रज्ञानाचा शोध घेऊन त्याचा उपयोग जनतेला अधिकाधिक सुविधा देण्यासाठी करावा. वाहतूक यंत्रणेसह ड्रोनचाही वापर करावा. यावेळी मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे, पुणे-कोल्हापूर, मुंबई-गोवा या महामार्गांवर वाढलेली अपघातांची संख्या याबाबत चिंता व्यक्त करुन अधिकाऱ्यांना नवीन योजना, नवीन तंत्रज्ञान स्वीकारुन, आहे ते तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी सूचना केसरकर यांनी केल्या.


'केल्ट्रॉन'च्या समावेशावर विचार

अपघात नियंत्रित करणाऱ्या केल्ट्रॉन यंत्रणेचा राज्यात समावेश करण्याबाबत विचार सुरु असून राष्ट्रीय महामार्गांवर लेन कटींग, ओव्हर स्पीड, ओव्हर टेक या प्रकारांची गांभीर्याने दखल घ्यावी, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा