Advertisement

मुंबईत उत्तर भारतीयांसाठी योगी सरकार कार्यालय उभारणार

आता राज ठाकरे यांची भूमिका बदल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

मुंबईत उत्तर भारतीयांसाठी योगी सरकार कार्यालय उभारणार
SHARES

मुंबईत (Mumbai) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारचं कार्यालय सुरू करण्यात येत असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी केली आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा यापूर्वी उत्तर भारतीयांच्या मुंबईत वाढत्या लोकसंख्येला विरोध होता. पण आता राज ठाकरे यांची भूमिका बदल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.  

मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) राहणाऱ्या उत्तर भारतीय समाजाच्या सोयीसाठी उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकार मुंबईत नवीन कार्यालय सुरू करणार आहे. या कार्यालयाद्वारे मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणारे उत्तर प्रदेशातील रहिवासी त्यांच्या राज्यात गुंतवणूक करू शकतात. तसंच सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करू शकतात.

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील यूपी सरकारने (UP Government) प्रस्तावित केलेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून, यूपीमधील सर्व रहिवाशांशी संपर्क साधू शकतात. नोकरी किंवा व्यवसायासाठी दीर्घकाळ मुंबईत राहत आहेत किंवा जे शोधात आहेत त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरेल. दरवर्षी रोजगारासाठी मुंबईत येणाऱ्या आणि पुन्हा उत्तर प्रदेशात पुन्हा जाणाऱ्यांसाठीइथं स्रव प्रकारची मदत उपलब्ध होईल.

एकीकडे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. पण राज यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे.

राज ठाकरे यांच्या यापूर्वीच्या परप्रांतिय विरोधी भूमिकेमुळे त्यांना उत्तर प्रदेशात येण्यास विरोध केला जात आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय जनतेची माफी मागावी. त्यानंतरच त्यांना अयोध्यात प्रवेश दिला जाईल, असं बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईत उत्तर भारतीय वंशाचे सुमारे 50 ते 60 लाख लोक राहतात. उत्तर भारतीय मजूर मुंबईत उद्योग, सेवा क्षेत्र, किरकोळ व्यापार, वाहतूक, खाद्य व्यवसाय, कारखाना किंवा गिरणी यासारख्या क्षेत्रात काम करतात.

खरे तर, आगामी पालिका (BMC) आणि इतर नागरी निवडणुकांमध्ये भाजपला अधिकाधिक उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे आकर्षित करायचे आहे. त्यामुळे भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.



हेही वाचा

राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, हायकोर्टात याचिका सादर

'राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही', भाजप खासदाराचा इशारा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा