Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

वर्षा राऊत यांना चौकशीसाठी पुन्हा समन्स

वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने पुन्हा एकदा समन्स बजावत ११ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

वर्षा राऊत यांना चौकशीसाठी पुन्हा समन्स
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र को. आॅप. बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने पुन्हा एकदा समन्स बजावत ११ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे वर्षा राऊत ४ जानेवारी रोजी स्वत:हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या.

पीएमसी बँकेच्या (pmc bank) ४ हजार ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. पीएमसी बँकेचे ९० कोटी रुपये हडपल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत व त्यांची पत्नी माधुरी राऊत यांची चौकशी करण्यात आली होती व त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले होते. तसंच, प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा- वर्षा राऊत एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर

याच घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. हे समन्स प्राप्त होताच ईडीने वर्षा राऊत यांनी कार्यालयात हजर राहण्यासाठी ५ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून मागितली होती. ही मुदत देताना ईडीने ५ जानेवारी रोजी त्यांना हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर झाल्या. 

सोमवारी साधारण दुपारी ३ वाजेच्या सुमारास वर्षा राऊत ईडी (ED) कार्यालयात दाखल झाल्या होत्या. तब्बल ४ तासाच्या चौकशीनंतर वर्षा राऊत यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी जाण्यास परवानगी दिली. या चौकशीत प्रवीण राऊत यांनी कर्ज म्हणून दिलेले ५५ लाख रुपये नेमके कशासाठी घेण्यात आले? तसंच ते व्याजमुक्त कर्ज होतं का?, हा व्यवहार कसा होता? आदी प्रश्न विचारण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. परंतु, चौकशी पूर्ण न झाल्यामुळं ईडीने पुन्हा एकदा वर्षा राऊत यांना समन्स बजावल्याचं म्हटलं जात आहे.

(varsha raut gets another summons from ed for pmc bank inquiry)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा