Advertisement

वर्षा राऊत एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या एक दिवस आधीच अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

वर्षा राऊत एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर
SHARES

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत या एक दिवस आधीच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

पंजाब अँड महाराष्ट्र को आॅपरेटिव्ह बँकेतील आर्थिक व्यवहाराप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. हे समन्स प्राप्त होताच ईडीने वर्षा राऊत यांनी कार्यालयात हजर राहण्यासाठी ५ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून मागितली होती. ही मुदत देताना ईडीने ५ जानेवारी रोजी त्यांना हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, एक दिवस आधीच ईडी कार्यालयात हजर झाल्या. 

हेही वाचा- संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना EDची नोटीस

पीएमसी बँकेच्या (pmc bank) ४ हजार ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. पीएमसी बँकेचे ९० कोटी रुपये हडपल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत व त्यांची पत्नी माधुरी राऊत यांची चौकशी करण्यात आली होती व त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले होते. तसंच, प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

पीएमसी बँकेत वर्षा राऊत यांच्या खात्यात १२ वर्षांपूर्वी निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याकडून ५० लाख रुपये भरण्यात आले होते. त्याचीच चौकशी करण्यासाठी वर्षा राऊत यांना समन्स बजावण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली. तर अगदी अलीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही ईडी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं. ईडी कडून करण्यात येणारी कारवाई ही पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरीत होऊन केली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. वर्षा राऊत ईडी कार्यालयात जात असताना शिवसेना (shiv sena) मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करेल, असंही म्हटलं जात होतं. परंतु हे वृत्त राऊत यांनी फेटाळून लावलं.

(shiv sena mp sanjay rauts wife varsha raut present at ed office for pmc bank scam inquiry)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा