वर्षा राऊत यांची ४ तास ईडीकडून चौकशी


वर्षा राऊत यांची ४ तास ईडीकडून चौकशी
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या अंमलबजावणी संचालनालय  कार्यालयात दाखल झाल्या आहेत. तब्बल ४ तासाच्या चौकशीनंतर वर्षा राऊत यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी जाण्यास परवानगी दिली. सोमवारी साधारण दुपारी ३ वाजणेच्या सुमारास वर्षा राऊत ईडी (ED) कार्यालयात दाखल झाल्या होत्या. राऊत यांना ईडी कार्यालयाकडून काही दिवसांपूर्वी नोटीस आली होती. या नोटीशीनुसार राऊत यांना कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

हेही वाचाः- रोज  १२ हजार मुंबईकरांना मिळणार कोरोना लस

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा राऊत यांनी एका व्यवहारात कथीत ५५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याबाबतच ईडी चौकशी करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारीच प्रवीण राऊत यांना झटका दिला आहे. प्रवीण राऊत यांची सुमारे ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे उद्योजक असून त्यांचे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचे मानले जाते. वर्षा राऊत यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात या आधीच बोलावले होते. मात्र, वर्षा राऊत यांनी चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी आपले वकील आणि इतर माहिती घेण्यासाठी अवधी मागून घेतला होता. वर्षा राऊत यांना ईडीनेही वेळ वाढवून दिला. आता नियोजीत वेळेनुसार वर्षा राऊत इडी कार्यालयात पोहोचल्या आहेत. ईडीची कारवाई ही सुडापोटी केली जात आहे. या कारवाईचे बोलते बोलवते धनी वेगळे आहेत. तरीही एक सरकारी आणि प्रमुख संस्था म्हणून ईडीच्या नोटीसचा आम्ही आदर करतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा