Advertisement

या सरकारमधील मोठ्या व्यक्तीनेच दाबलं दाभोलकर हत्या प्रकरण, आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

सध्याच्या सरकारमधील मोठ्या व्यक्तीनेच हे प्रकरण त्या काळी दाबलं होतं, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

या सरकारमधील मोठ्या व्यक्तीनेच दाबलं दाभोलकर हत्या प्रकरण, आंबेडकरांचा खळबळजनक आरोप
SHARES

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद दाभोलकर यांच्या खुनाला गुरूवारी ७ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पुण्यात ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. तसंच, दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध लागत नसल्याबद्दल राज्य सरकारचा निषेध देखील केला. या पार्श्वभूमीवर दाभाेलकर यांना आदरांजली वाहतानाच सध्याच्या सरकारमधील मोठ्या व्यक्तीनेच हे प्रकरण त्या काळी दाबलं होतं, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. (vba chief prakash ambedkar comment on narendra dabholkar murder case)

डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला ७ वर्ष पूर्ण होताय.आरोपींचा आणि त्या कटाच्या मास्टरमाईंडचा अजूनही शोध लागलेला नाही तो लागणारही नाही. राज्यात सेक्युलर सरकार आलंय अस म्हणतात. पण,आम्हाला तरी शंका आहे की, या सेक्युलर सरकारमधील मोठी व्यक्ती आहे, ज्याने हे प्रकरण त्याचकाळी दाबलं होतं.

हेही वाचा - सुशांत प्रकरणाची अवस्था दाभोलकर हत्या प्रकरणासारखी होऊ नये- शरद पवार

पुरोगामी हा व्यक्ती शोधतील का ?

समस्त पुरोगामी मंडळींना माझं सांगणं आहे की, ही लढाई न्यायालयीन नसून राजकीय आहे, तेव्हा त्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. इथल्या संत परंपरेविरुद्ध वैदिक परंपरेचे हे राजकीय युद्ध आहे. या युध्दातले खरे मित्र आणि खरे शत्रू ओळखून निराश न होता, न घाबरता हे आंदोलन चालू ठेवण्याची गरज आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना विनम्र आदरांजली.. असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी हे आरोप केले आहेत.

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास #CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी #CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही, असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा