Advertisement

राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका

देशाच्या सुरक्षेसंदर्भात इतकी गंभीर माहिती असतानाही रितसर तक्रार दाखल का करण्यात आली नाही ? असा प्रश्न बालाकृष्णन यांनी आपल्या याचिकेतून उपस्थित करताना राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्या सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

राज ठाकरेंची सीआयडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका
SHARES

निवडणुकीच्या आधी देशात पुन्हा एकदा पुलवामासारखा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात ज्येष्ठ पत्रकार आणि वकील एस. बालाकृष्णन यांनी
मंगळवारी केली. उच्च न्यायालयाने मात्र या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.


काय म्हणाले राज?

विविध सरकारी योजनांमध्ये आलेल्या अपयशावरून मतदारांचं लक्ष वळवण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुलवामासारखा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असं राज म्हणाले होते. ९ मार्च रोजी मनसेच्या १३ व्या वर्धापन दिन सोहळ्यातील सभेत भाषण करताना राज यांनी हे वक्तव्य केलं होतं.


लेखी तक्रारीकडे दुर्लक्ष

यानंतर एस. बालाकृष्णन यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार करत राज यांच्या वक्तव्याची पोलिस चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने. बालाकृष्णन यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.


गुन्हा नोंदवा

देशाच्या सुरक्षेसंदर्भात इतकी गंभीर माहिती असतानाही रितसर तक्रार दाखल का करण्यात आली नाही ? असा प्रश्न बालाकृष्णन यांनी आपल्या याचिकेतून उपस्थित करताना राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्या सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

देशावर मोठा दहशतवादी हल्ला होऊन युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य राज ठाकरे यांनी कल्याणमधील सभेत केलं होतं. त्यानंतरच पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. परंतु उच्च न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. पुलवामा इथं १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४०जवान शहीद झाले होते.



हेही वाचा-

म्हणून राज ठाकरे भडकले, पावणे दोन तासाने लागला मतदानासाठी नंबर

‘आता बघाच तो व्हिडिओ’ला ‘सोडवा ती प्रश्नपत्रिके’नं मनसेचं उत्तर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा