Advertisement

‘आता बघाच तो व्हिडिओ’ला ‘सोडवा ती प्रश्नपत्रिके’नं मनसेचं उत्तर

राज्यातील मतदानाचा अखेरचा टप्पा सोमवारी पार पडणार आहे. मतदान जवळ आलं असतानाच मनसे आणि भाजपमधील कलगीतुरा अधिकच रंगला आहे. शनिवारी भाजपने मुंबईत आता बघाच तो व्हिडिओ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

‘आता बघाच तो व्हिडिओ’ला ‘सोडवा ती प्रश्नपत्रिके’नं मनसेचं उत्तर
SHARES

राज्यातील मतदानाचा अखेरचा टप्पा सोमवारी पार पडणार आहे. मतदान जवळ आलं असतानाच मनसे आणि भाजपमधील कलगीतुरा अधिकच रंगला आहे. शनिवारी भाजपने मुंबईत आता बघाच तो व्हिडिओ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये भाजपनं राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर मनसेनं याला लगेचच प्रत्युत्तर देत ५६ प्रश्नांची उत्तरं देण्याचं आवाहन केलं आहे.  

अनोखी प्रश्नपत्रिका

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईत एका कार्यक्रमात राज ठाकरे यांची पूर्वीची भाषणं दाखवून पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु याला काही तास उलटत नाहीत तर मनसेनं पुन्हा भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यासाठी मनसेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ५६ गुणांची प्रश्नपत्रिका तयार केली आहे.

यात सरकारच्या मागील ५ वर्षांतील कामकाजावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसंच यामध्ये दोघांनाही काही सूट देण्यात आल्याचंही मनसेनं नमूद केलं आहे. ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी २ दिवसांचा कालावधी देण्यात आला असून यासाठी कोणाचीही मदत घेतली तरी चालू शकतं, असं मनसेनं म्हटल आहे.


काय आहेत प्रश्न ?

नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे हे पाकिस्तानमधील कोणत्या नेत्याला वाटते, महाराष्ट्रातील कोणता नेता शेतकऱ्यांना 'साले' म्हणतो, जवानांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त वक्तव्य कोणत्या भाजप आमदाराने केले, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी होणार, आजवर पंतप्रधानांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या, पंतप्रधान किती देश फिरले, त्यातून काय साध्य झाले, राफेल करारावर पंतप्रधान जाहीरपणे स्पष्टीकरण का देत नाहीत असे अनेक प्रश्न मनसेनं विचारले आहे. आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देईल हे पाहावं लागणार आहे.



हेही वाचा -

लोसकभा निवडणुकीनिमित्त ३ दिवस 'ड्राय-डे'

Video: माझे व्हिडिओ मतदारांसाठी रिमाइंडर काॅल- राज ठाकरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा