मंदिर पाडण्यास बजरंग दलाचा विरोध

दहिसर - पालिकेकडून पाडण्यात येणाऱ्या हनुमान मंदिराला विश्वहिंदू परिषद आणि बजरंगदलाने विरोध करत पालिकेची कारवाई हाणून पाडली. दहिसर पोलीस स्टेशनच्या चेक नाक्याला लागून असलेल्या एमएमआरडीए ऑफिसच्या मध्ये 30 वर्ष जुनं इच्छापूर्ती हनुमान मंदिर आहे. विशेष म्हणेज हे मंदिर अशा जागी आहे ज्याचा कुणालाही त्रास होणार नाही. तरीदेखील 26 नोव्हेंबरला पालिकेच्या उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिर तोडण्यात येणार असून, पोलीस संरक्षण द्या अशा आशयाचे पत्र पोलिसांना पाठवले. याची माहिती बंजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. आणि त्यांनी पालिकेच्या कारवाईला कडाडून विरोध करत त्यांचा डाव हाणून पाडला.

Loading Comments