SHARE

नोटाबंदीला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. काळ्या पैशाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये याच दिवशी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. बुधवारी पंतप्रधानांच्या या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत असताना भाजपा सरकार 'अँटी ब्लॅक मनी डे' साजरा करत आहे. तर दुसरकीडे काँग्रेस काळा दिवस साजरा करत आहे. या दोन्ही राजकीय पक्षांनी आता डिजीटल मीडियावर आपल्या प्रचाराला गती आणली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर नोटाबंदीमुळे झालेल्या अडचणी दाखवण्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केला आहे.तर तिकडे नोटाबंदीचे फायदे सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे.संबंधित विषय
ताज्या बातम्या