Advertisement

मी कुठल्याही राजकीय पक्षात जात नाहीय- संजय दत्त

बाॅलिवूड अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षा (रासपा)त प्रवेश करणार अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असताना संजयने त्यावर खुलासा केला आहे. मी सद्यस्थितीत कुठल्याही राजकीय पक्षात जात नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

मी कुठल्याही राजकीय पक्षात जात नाहीय- संजय दत्त
SHARES

बाॅलिवूड अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षा (रासपा)त प्रवेश करणार अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असताना संजयने त्यावर खुलासा केला आहे. मी सद्यस्थितीत कुठल्याही राजकीय पक्षात जात नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. रविवारी ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी संजय दत्त लवकरच आपल्या पक्षात येणार असल्याचं म्हटलं होतं.

काय म्हणाले होते जानकर?

संजय दत्त यांनी पक्षप्रवेशासाठी २५ ऑगस्टची तारीख मागितली होती. पण त्यांना चुकून २५ सप्टेंबरची तारीख देण्यात आली. त्यामुळे त्यांचा प्रवेश होऊ शकला नाही. पण ते २५ सप्टेंबरला रासपमध्ये प्रवेश करतील. संजय दत्तने निवडणुकीच्या आधी रासपमध्ये प्रवेश केल्यास त्याचा पक्षाला फायदा होईल. कारण मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाला एक सेलिब्रिटी चेहरा मिळेल, असं जानकर आपल्या भाषणात म्हणाले होते. 

त्यावरून राजकीय वर्तुळात तसंच सिने क्षेत्रातही बरीच चर्चा रंगली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे संजय दत्तची मोठी बहिण प्रिया दत्त स्वत: काँग्रेसतर्फे निवडणूक लढवतात. त्यामुळे संजयची प्रतिक्रिया जाणून घेण्यास सर्वच जण उत्सुक होते. 

मात्र यावर खुलासा करताना संजय म्हणाला की, 

मी सद्यस्थितीत कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करत नाहीय. महादेव जानकर हे माझे चांगले मित्र आणि भावाप्रमाणे आहेत. मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो.

तसंच संजय दत्त ‘रासप’मध्ये प्रवेश करणार असल्याचं मी कधीच म्हटलं नव्हतं, असं जानकर यांनी देखील स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार?

‘ईव्हीएम’ने नाही, तर जनतेने काँग्रेसला हरवलं- मुख्यमंत्री



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा