Advertisement

‘ईव्हीएम’ने नाही, तर जनतेने काँग्रेसला हरवलं- मुख्यमंत्री

काँग्रेस सत्तेत असताना ईव्हीएम खराब नव्हतं आणि भाजपा सत्तेत आल्यावर ईव्हीएम लगेच खराब कसं झालं, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.

‘ईव्हीएम’ने नाही, तर जनतेने काँग्रेसला हरवलं- मुख्यमंत्री
SHARES

काँग्रेस सत्तेत असताना ईव्हीएम खराब नव्हतं आणि भाजपा सत्तेत आल्यावर ईव्हीएम लगेच खराब कसं झालं, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला ईव्हीएमने नाही, तर जनतेने हरवलं आहे. त्यामुळे पुढची २५ वर्षे भाजपाच सत्तेत राहणार आहे, असं वक्तव्य केलं. महाजानदेश यात्रेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धारेवर धरलं.

ईव्हीएम खराब कसं? 

'ईव्हीएम २००४ साली देशात आलं. तर महाराष्ट्रात आणि देशात काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता २०१४ पर्यंत होती. त्यावेळी ईव्हीएम खराब नव्हतं. मग भाजप जिंकायला लागल्यावरच ईव्हीएम खराब कसं काय झालं? सुप्रिया सुळे जिंकल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं आणि डॉ. सुजय विखे जिंकले तेव्हा ईव्हीएम खराब कसं होऊ शकतं? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला.

जनतेची माफी मागा

काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेत असताना जनतेची कामं केली नाहीत. त्यामुळे जनतेनं त्यांना दूर लोटलं. पण ते ईव्हीएमला दोष देतात. मात्र त्यांना ईव्हीएम नाही, तर मतदार हरवत असल्याचं ते विसरतात. ते सत्तेत असताना १५ वर्षांच्या काळात जेवढी कामे झाली नाही, त्यापेक्षा जास्त कामे आम्ही गेल्या ५ वर्षांत करून दाखविली आहे. त्यामुळे पुढची २५ वर्षे तरी काँग्रेस सत्तेत येणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या चुकांची जनतेपुढं माफी मागावी. तसं केल्यास थोडीफार मतं मिळून विरोधी पक्ष म्हणून त्यांना काम करता येईल, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला. 



हेही वाचा-

अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार?

चक्क काँग्रेस देतेय मुख्यमंत्रीपदाची आॅफर, पण कुठे?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा