अभिनेता संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार?

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लवकरच राष्ट्रीय समाज पक्षा (रासप) त प्रवेश करणार असल्याची माहिती रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली.

SHARE

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लवकरच राष्ट्रीय समाज पक्षा (रासप) त प्रवेश करणार असल्याची माहिती रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली. मुंबईत रविवारी रासपचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  

काय म्हणाले जानकर?

महामेळाव्यात बोलताना जानकर म्हणाले की, 'विधानसभा निवडणूक अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे इतर पक्षांप्रमाणेच रासप देखील आपल्या परिने पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सिने इंडस्ट्रीमधील माणसं रासपमध्ये येत आहेत. अभिनेता संजय दत्त हा २५ सप्टेंबरला रासपमध्ये प्रवेश करणार आहे. संजय दत्तने निवडणुकीच्या आधी रासपमध्ये प्रवेश केल्यास त्याचा पक्षाला फायदा होईल. कारण मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाला एक सेलिब्रिटी चेहरा मिळेल.

संजयच्या शुभेच्छा

दुसऱ्या बाजूला संजय दत्तने एका व्हिडिओद्वारे पक्षाला शुभेच्छा दिल्या. ‘महादेव जानकर हे माझे भाऊ असून रासपला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.', असा संदेश त्याने या व्हिडिओतून दिला. रासप सध्या भाजपसोबत सत्तेत असून येत्या विधानसभा निवडणुकीतही रासप भाजपसोबतच राहण्याची शक्यता आहे.


हेही वाचा- 

चक्क काँग्रेस देतेय मुख्यमंत्रीपदाची आॅफर, पण कुठे?

जागा वाटपाचा निर्णय आम्ही तिघेच घेणार- उद्धव ठाकरेसंबंधित विषय
ताज्या बातम्या