Advertisement

जागा वाटपाचा निर्णय आम्ही तिघेच घेणार- उद्धव ठाकरे

युतीतील जागा वाटपाचा निर्णय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत: असे तिघे मिळून घेऊ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

जागा वाटपाचा निर्णय आम्ही तिघेच घेणार- उद्धव ठाकरे
SHARES

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेमधील जागा वाटप जुन्या समीकरणानुसार होणार नाही, असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना युतीतील जागा वाटपाचा निर्णय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत: असे तिघे मिळून घेऊ असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.  

काय म्हणाले होते पाटील?

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडे १३५ पेक्षा अधिक जागा मागणार आहोत. कारण १३५ जागांमध्ये आमचं भागणार नाही. शिवाय जिंकलेल्या जागा सोडण्याची दोन्ही पक्षांची मानसिकता नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. 

उद्धव यांचं स्पष्टीकरण

बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार विलास तरे यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना चंद्रकात पाटील यांच्या विधानाबाबत विचारलं असता, जागावाटपाचा निर्णय मी, मुख्यमंत्री आणि अमित शहा मिळून घेऊन. बाकी इतर कुणालाही आपण गृहीत धरत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला फारशी किंमत देत नसल्याचं सूचित केलं.   



हेही वाचा-

'बविआ'चे आमदार विलास तरे यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्राचे आरोपी, मनसेची भाजपच्या नेत्यांविरोधात पोस्टरबाजी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा