Advertisement

चक्क काँग्रेस देतेय मुख्यमंत्रीपदाची आॅफर, पण कुठे?

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी युथ काँग्रेसने एक आगळी-वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. 'मैं भी नायक, सीएम फॉर अ डे' असं या स्पर्धेचं नाव आहे.

चक्क काँग्रेस देतेय मुख्यमंत्रीपदाची आॅफर, पण कुठे?
SHARES

तुम्हाला आजच्या परिस्थितीची चीड येते का? तुम्हाला ही परिस्थिती बदलावीशी वाटते का? मग तुम्हाला जर मुख्यमंत्री केलं तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न विचारत महाराष्ट्र युथ काँग्रेस तरूणांना एक दिवस मुख्यमंत्री होण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी युथ काँग्रेसने एक आगळी-वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. 'मैं भी नायक, सीएम फॉर अ डे' असं या स्पर्धेचं नाव आहे. 

जिल्हास्तरीय स्पर्धा 

या स्पर्धेतील विजेत्या युवकाला जिथे काँग्रेसची सत्ता आहे. म्हणजेच पंजाब, मध्य प्रदेश आणि राजस्थान अशा राज्यांत एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत घालवण्याची संधी मिळणार आहे. 'वेक अप महाराष्ट्र' या मोहिमेंतर्गत ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येईल. या स्पर्धेत ६ सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी करता येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या युवकांना महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात विविध सूचना, कल्पना, वकृत्व, अभिनय किंवा पाॅवर पाॅईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर करायच्या आहेत. 

आजचे तरुण सोशल मीडियावर स्वत:ची राजकीय, सामाजिक मतं हिरिरीने मांडत असतात. विकासकामांसंदर्भात त्यांच्या स्वत:च्या वेगवेगळ्या कल्पना असतात. परंतु त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. वेक अप महाराष्ट्र अभियानातून या तरूणांच्या कल्पकतेला वाव देण्यात येईल. भविष्यात यातूनच महाराष्ट्रातील राजकारणी घडतील.

-सत्यजीत तांबे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस

५ स्पर्धकांना संधी

त्यानुसार मुंबई होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून २ स्पर्धक निवडले जातील. यातून परिक्षकांनी निवडलेल्या ५ विजेत्यांना काँग्रेसच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत एक दिवस घालवण्याची, त्यांच्यासोबत विकासकामांवर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. हे युवक वेक अप महाराष्ट्र अभियानाचाही भाग होतील. 



हेही वाचा-

प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांतीचा मोर्चा

महाराष्ट्राचे आरोपी, मनसेची भाजपच्या नेत्यांविरोधात पोस्टरबाजी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा