Advertisement

हेच पळपुटे, कुठून तरी तुमच्या तंबूत शिरले होते, शिवसेनेची पवार यांच्यावर टीका


हेच पळपुटे, कुठून तरी तुमच्या तंबूत शिरले होते, शिवसेनेची पवार यांच्यावर टीका
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणारे नेते पळपुटे आहेत. त्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यावर स्वाभिमान नेमका काय असतो पवारसाहेब? असा खोचक प्रश्न विचारत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांना लक्ष्य केलं आहे.   

अग्रलेखातून टीका

राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयी बोलताना पवार यांनी एका सभेत स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित केला होता. “कोणी सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे. पळपुट्यांना मतदार धडा शिकवतील,” असं पवार म्हणाले होते. याच मुद्यावरून शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका पवार यांच्यावर टीका केली आहे. 

तंबूच भुईसपाट

“पवार यांनी नव्याने पक्षबांधणीसाठी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले आहेत. त्यांचा काम करण्याचा झपाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील मेगा गळतीचा सगळय़ात मोठा फटका पवारांच्या राष्ट्रवादीला बसला आहे. ‘कोणी सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे,’ असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? वळणाचे पाणी वळणाला गेले,” असा टोला शिवसेनेने लगावला.

मतदार धडा शिकवतील

पळपुट्यांना मतदार धडा शिकवतील, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. पवार यांनी सत्य सांगितले आहे. शिवसेनेतून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत वेळोवेळी जे लोक गेले त्यांचा त्या त्या वेळी पराभव झाला आहे. छगन भुजबळ हे शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांचा माझगावात पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत नाशिकला त्यांना मतदारांनी धूळ चारली. नारायण राणे यांचा कोकणात पराभव झाला व नवी मुंबईत गणेश नाईक पराभूत झाले. एखादा अपवाद वगळता भुजबळ-राणेंबरोबर गेलेले आमदार पुन्हा विधानसभेत दिसले नाहीत, पण तो इतिहास झाला.


हेही वाचा-

पक्ष सोडून गेलेल्यांची चिंता नको, पुढचं सरकार आपलंच- शरद पवार

काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांवर ‘अशी’ केली मात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा