शिवस्मारकाच्या संघर्षाची यशोगाथा आता पुस्तकात

 Pali Hill
शिवस्मारकाच्या संघर्षाची यशोगाथा आता पुस्तकात
शिवस्मारकाच्या संघर्षाची यशोगाथा आता पुस्तकात
शिवस्मारकाच्या संघर्षाची यशोगाथा आता पुस्तकात
See all

मुंबई - शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना शिवस्मारक समितीच्या अध्यक्ष पदावरून हटवावे यासाठी काही मराठा संघटना प्रयत्नशील असताना मेटे यांनी शिवस्मारक समितीच्या माध्यमातून 'संघर्ष शिवस्मारकाचा' या पुस्तकाचे प्रकाशन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात ज्यांनी शिवस्मारकासाठी प्रयत्न केले आहेत त्यांचा उल्लेख आहे. मात्र ज्यांनी काही केले नाही त्यांचा उल्लेख या पुस्तकात नाही अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिली.

शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत. हे पुस्तक शिवस्मारक समितीने प्रकाशित केले आहे जेणेकरून कोणी प्रश्न उपस्थित केले तर त्याला यामध्ये उत्तर सापडेल असंही त्यांनी प्रकाशनादरम्यान सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या कारकिर्दीत स्मारकाचे काम पुढे होत असल्याचे सांगत मच्छिमारांच्याही समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली.

Loading Comments