25 वर्ष युतीत नक्की कुणाची सडली?- विनोद तावडे

  Vikhroli
  25 वर्ष युतीत नक्की कुणाची सडली?- विनोद तावडे
  मुंबई  -  

  विक्रोळी - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडली आणि शिवसेना भाजपा वाद चव्हाट्यावर आला. युतीमुळे शिवसेनेची 25 वर्ष सडली असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला होता. यालाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिलंय. 25 वर्ष युतीत नक्की कुणाची सडली? असा खरपूस सवाल विनोद तावडे यांनी शिवसेनेला विचारला. युतीच्या जोरावर शिवसेनेतील जे गडगंज श्रीमंत झाले , जे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झाले , जे महापौर झाले त्यांना विचारा युतीत कुणाची किती वर्ष सडली ते असा शिवसेनेचा खरपूस समाचार या वेळी विनोद तावडे यांनी घेतला. मंगळवारी विक्रोळीतील कन्नमवारनगरमध्ये भाजपाच्या झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.