मीरा-भाईंदरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा गोंधळ

भाईंदर - मीरा- भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परिसरात गोंधळ घातला. स्थानिक मराठी वृत्तपत्र 'राजसत्ता'मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला आहे. या फोटोत उद्धव ठाकरे गळ्यात ढोल घेऊन आहेत. तर, मुख्यमंत्र्यांना एका महिलेच्या रुपात दाखवण्यात आलंय. याचं फोटोच्या निषेधार्थ नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी 'राजसत्ता' या वृत्तपत्रावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. तसंच भाजपा कार्यकर्त्यांनी राजसत्ता या वृत्तपत्राचे संपादक वसंत माने यांच्या घरी जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या सर्व परिस्थितीमुळे जवळपास दोन तास रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी कार्यकर्त्यांनी संपादकांना अटक करण्याची मागणी केली आहे.

Loading Comments