Advertisement

दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार; मतदारांमध्येही उत्साह


दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार; मतदारांमध्येही उत्साह
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. यासाठी प्रशासन सज्ज झालं असून या निवडणुकीत मुंबईतून तब्बल ११६ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. मतदारांमध्येही सकाळपासून उत्साह पाहायला मिळत असून सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

वंचित आघाडीचं आव्हान

मुंबईतील सहाही जागांवर यावेळी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुती आघाडीमध्ये थेट लढत असली तरी मनसेच्या सभांमुळे आणि वंचित आघाडीनं दिलेल्या उमेदवारांमुळे या निवडणुकीत रंगत आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही मतदारसंघांमध्ये आघाडीचा सुपडा साफ झाला होता. त्यामुळे आता ही प्रथा कायम राहणार की बदलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा