आम्ही मतदान करणार !

दादर - महापालिका निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. सर्वसाधारणपणे मतदान करण्याबाबत अनेकांमध्ये उदासीनता दिसून येते. त्यामुळे निवडणूक आयोगासह अनेकांकडून मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर या महापालिका निवडणुकीत मुंबईकर मतदान करणार आहेत की नाही? हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘मुंबई लाईव्ह’ने केला. त्यावेळी मिळालेल्या प्रतिक्रिया सकारात्म होत्या. अनेकांनी मतदान करणार असल्याचे सांगितले. जर उमेदवार आवडला नाही तर आम्ही नोटाचा पर्याय वापरू असेही काहीजणांनी सांगितले आहे. मतदानासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींच्या ऑफर्स तितक्याशा प्रभावी ठरणार नाहीत असाही मतप्रवाह काहीजणांकडून व्यक्त केला गेला आहे. मात्र तरीही एकूणच मतदान करण्यासाठी मुंबईकर उत्सूक असल्याचे दिसत आहे.

Loading Comments