जोगेश्वरी - राज्यमंत्री आणि जोगेश्वरी मतदारसंघाचे आमदार रविंद्र वायकर बालदिनानिमित्त लहानमुलांमध्ये रमताना पाहायला मिळालेत. जोगेश्वरी वॉर्ड क्र. 66 मध्ये एकूण आठ ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रम वायकर यांच्याहस्ते होता. त्यावेळी अचानक काही लहान मुलांनी वायकर यांच्या समोर घोळका केला. दरम्यान वायकर यांनी सगळ्या मुलांना जवळ घेत त्यांना खाऊ दिले आणि बालदिन साजरा केला. या लहानग्यांनी आपणास लहानपणीच्या दिवसांची आठवण करून दिल्याचं वायकर यांनी व्यक्त केलं. यावेळी शाखाप्रमुख अमर मालवणकर, महिला शाखा संघटक दिपाशा पवार, आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.