Advertisement

बोरिवलीत भाजपा फायद्यात


बोरिवलीत भाजपा फायद्यात
SHARES

बोरिवली - मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग पुर्नरचना आणि वॉर्ड आरक्षण सोडतीत आर दक्षिण विभागात भाजपाला फायदा झाल्याचे चित्र आहे. आरक्षणातील किरकोळ बदल वगळता येथील प्रभागरचना जैसे थे राहिल्याने बालेकिल्ल्यात भाजपाला दिलासा मिळाला आहे.
मनसे नगरसेवक चेतन कदम, काँग्रेस नगरसेवक शिवानंद शेट्टी, भाजप नगरसेविका बिना दोशी, मोहन मिठबावकर, प्रवीण शहा, आसावरी पाटील यांच्या प्रभागामधील आरक्षणात बदल झाला आहे. मात्र बोरिवलीतील भाजपचे वर्चस्व पाहता भाजपच्या पाचही नगरसेवकांना या आरक्षणाचा कोणताही फरक पडणार नाही.
नव्या प्रभाग आरक्षणाबात भाजप नगरसेविका बिना दोशी म्हणाल्या "माझ्या प्रभागात पुरुष आरक्षण आले आहे, त्यामुळे मी अदयाप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल." तर आरक्षणाचा फटका बसलेले मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी आता आपण संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.
मी नेतृत्व करत असलेला पूर्वीचा 13 नंबर प्रभाग नव्याने 14 झाला आहे, तेथे नव्याने महिला ओबीसी आरक्षण देण्यात आले आहे. यापुढे मी नगरसेवक पदाचा दावेदार राहणार नाही, तर पक्षासाठी संघटना बांधणीवर भर देणार असल्याचे मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी सांगितले. तसेच आमच्या पक्षातील कोणी महिला पदाधिकारी तेथे इच्छूक असल्यास त्यांना सहकार्य करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
"आरक्षण जरी बदलले असले तरी बोरिवलीतील भाजप आमदार, खासदारांनी केलेल्या कामांमुळे बोरिवलीत भाजपचेच नगरसेवक निवडणून येतील, प्रभाग फेररचनेचा कोणताही परिणाम होणार नाही", असा विश्वास भाजपा नगरसेवक मोहन मिठबांवकर यांनी व्यक्त केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा