आम्ही राजीनामे खिशातून बाहेर काढलेत - रामदास कदम

 Malabar Hill
आम्ही राजीनामे खिशातून बाहेर काढलेत - रामदास कदम

मलबार हिल - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी स्पष्ट केले की, "आमचे राजीनामे खिश्यातून बाहेर काढले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आम्ही राजीनामे लगेच देऊ."

राज्यातील सर्व महापालिकेमध्ये पारदर्शकता आणली पाहिजे. सर्व जिल्हापरिषदांमध्ये पारदर्शकता पाहिजे, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली. यासाठी तयार करण्यात आलेली समिती अभ्यास करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे बाजू मांडून राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी दिली पाहिजे, अशीही मागणी रामदास कदम यांनी केलीय. या पत्रकार परिषदेत दिवाकर रावते, एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

Loading Comments