दोन झेंड्यांना एकच दांडा

कुलाबा - तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना अशी काहीशी अवस्था शिवसेना-भाजपा या दोन पक्षांची आहे. कधी कुणी कावळ्याची उपमा देतंय. तर कुणी श्राद्ध घालण्यासाठी मीच कावळा असल्याचा दावा करतंय. मात्र दोन्ही पक्षांचे वाद कितीही टोकाला गेले तरी दोन्ही पक्षांच्या झेंड्यांना एकाच दाड्यांने आधार दिलाय. याचा व्हिडिओ ‘मुंबई लाइव्ह’च्या हाती लागलाय. हा व्हिडिओ आपण नीट पाहा. या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे शाखा प्रमुख संतोष वीर हे भाजपाच्या झेंड्यांची काठी शिवसेनेच्या झेंड्यांसाठी वापरताना दिसतायेत. बाकी वैर दोन्ही पक्षांमध्ये कितीही असो पण शिवसेनेच्या झेंड्यांना भाजपाचा दांडाच लागतोय हेही तितकच खर.

Loading Comments