• अखंड हिंद पार्टीची बैठक
SHARE

बोरीवली - अखंड हिंद पार्टीची बैठक बोरीवली (पू.) इथल्या नॅशनल पार्क बंगला क्रमांक 10 मध्ये मंगळवारी पार पडली. या बैठकीत अखंड हिंद पार्टीचे संस्थापक हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. हितेंद्र ठाकूर म्हणाले की, आमचा पक्ष हिंदूत्वाचा पक्ष आहे, हिंदू राष्ट्र घडवणं आणि रामराज्य आणणं हा आमचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. आपल्या राज्यात मोफत शिक्षण प्राप्त होईल. दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची इच्छा नाही त्यांना त्यांच्या कुवतीनुसार नोकरी दिली जाईल. यामुळे बेरोजगारी दूर होईल. या वेळी नवनिर्वाचित पदाधिकारी अखिलेश सिंह यांचा सत्कारही करण्यात आला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या