आगामी निवडणुकांत भगवा फडकणार


  • आगामी निवडणुकांत भगवा फडकणार
SHARE

शिवाजी पार्क - 'येत्या चार महिन्यांत राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भगवा झेंडा फडकवणारच,' असा ठाम विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी व्यक्त केला. शिवाजी पार्कमधील शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात ते बोलत होते.

या वेळी देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांवर टीकास्र सोडले.'मराठा समाजाला आरक्षण देणार, असे मुख्यमंत्री म्हणाले मात्र कधी देणार हा शिवसेनेचा सवाल आहे. मराठा समाजाची भावना ही असंतोषाची भावना आहे. इगतपुरी मध्ये तापलेल्या वातावरणाबाबत शासनाला उत्तर दयावे लागेलच'. असे देसाई यांनी म्हटले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या