मुंबईकरांनो, आठवडा बाजार सुरूच राहणार - सदाभाऊ खोत

Nariman Point, Mumbai  -  

महाराष्ट्रातल्या लाखो जनतेचा खऱ्या अर्थाने पोशिंदा असलेल्या ‘बळीराजा’, म्हणजेच शेतकऱ्यानं संपाचं हत्यार उगारलं आहे. राज्य सरकारसाठी हा बाका प्रसंग आहे. तीन दशकांहून अधिक काळ शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेता आणि राज्याचे विद्यमान कृषी, फलोत्पादन आणि पणनराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासाठी हा कसोटीचा काळ आहे. शेतकऱ्यांचे ‘आ’ वासून उभे राहिलेले प्रश्न, संत शिरोमणी सावतामाळी आठवडे बाजाराचं अस्तित्व, संपकाळात उद्भवणारा शेतमालाचा तुटवडा, अव्वाच्या सव्वा वाढलेले भाज्यांचे दर, दुधाची उपलब्धता आदी सर्वसामान्य भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ‘मुंबई लाइव्ह’ने शेतकरी नेता आणि मंत्रीमहोदय या दोन्ही भूमिकांमधून सदाभाऊ खोत यांना बोलतं केलं. कधीकाळचे जिवलग मित्र आणि खासदार राजू शेट्टी यांच्याशी झालेले मतभेद, जीवनातली वादळं आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेशाबद्दलच्या प्रश्नांची सदाभाऊ खोत यांनी दिलेली उत्तरं जाणून घेण्यासाठी खोत यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिलेली ही विशेष मुलाखत पहा.

Loading Comments