भाजपामध्ये जाणार? या तर फक्त चर्चा !

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - मुंबई पालिका निवडणुकांचं वातावरण आता तापू लागलं आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी शिवसेना-भाजपसोबतच विरोधातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र या सर्व राजकीय गोंधळात राज ठाकरेंची मनसे मात्र कुठेच दिसत नाहीये. अजूनपर्यंत मनसेचा म्हणावा तसा बोलबाला सुरु झालेला नाही. त्यामुळे नक्की मनसे पालिका निवडणुकांसाठी काय तयारी करत आहे? किंबहुना मनसे खरंच ही निवडणूक लढवणार आहे की नाही? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न ‘मुंबई लाइव्ह’नं 'उंगली उठाओ'  या विशेष निवडणूक कार्यक्रमात केलाय. प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ‘मुंबई लाइव्ह’च्या स्टुडिओमध्ये आले होते मनसेचे नगरसेवक संतोष धुरी. धुरींच्या नाराजीतून पक्षांतराच्या चर्चेपासून शिवसेना भाजपाच्या ठरलेल्या राजकारणासोबतच मनसेच्या निवडणूक तयारीपर्यंतच्या प्रश्नांना संतोष धुरींनी उत्तरं दिली.

Loading Comments