मुंबईच्या नव्या वोटर्सचं म्हणणं आहे तरी काय?

  मुंबई  -  

  मुंबई - महापालिका निवडणूक आगदी काही दिवसांवर येऊन ठेपलीय. या वेळीही पहिल्यांदाच मत देणारे यंगस्टर्सही अधिक आहेत. तसे पाहायला गेले तर हल्लीचे यंगस्टर्स सर्वच गोष्टीत पुढाकार घेतात, अगदी राजकारणातही. या यंगस्टर्सचा एकंदरीतच सर्व गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला दिसतो. इंटरनेटमुळे विविध क्षेत्रांतील जागतिक घडामोडींबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. म्हणून तरुणांच्या विचारांच्या कक्षाही रुंदावल्या आहेत.

  याच यंगस्टर्सना महापालिका निवडणुकीसंदर्भात किती माहिती आहे? किंवा त्यांच्या वॉर्डमध्ये कोण उभे आहेत? त्यांच्या राजकारण्यांकडून काय अपेक्षा आहेत? यावर मुंबई लाइव्हने काही यंगस्टर्सची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या काही यंगस्टर्सना ही निवडणूक नगरसेवक पदासाठी आहे की महापौर पदासाठी हेच ठाऊक नव्हते. तर काही यंगस्टर्सनी नगरसेवकांकडून कश्या आणि कोणत्या विकासकामांची अपेक्षा आहे हे बोलून दाखवले. जर मतदान करायचे नसेल तर नाटो हा एक पर्याय आहे, याचीही आठवण काहींनी करून दिलीय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.