आक्रोश रॅलीला काँग्रेसचे नेते गैरहजर


  • आक्रोश रॅलीला काँग्रेसचे नेते गैरहजर
  • आक्रोश रॅलीला काँग्रेसचे नेते गैरहजर
SHARE

मुंबई - सोमवारी काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेल्या आक्रोश रॅलीला काँग्रेसच्या काही नेत्यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. या रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, माजी खासदार एकनाथ गायकवाड, कृपाशंकर सिंह, खासदार हुसैन दलवाई, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, चरणजीत सप्रा, माजी मंत्री वर्षा गायकवाड हजर होते. तर आक्रोश रॅलीच्या बॅनरवर झळकणारे गुरूदास कामत, नारायण राणे, प्रिया दत्त, जनार्दन चांदुरकर अनुपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रावादीचे मुंबई शहर अध्यक्ष सचिन अहिर, माजी आमदार मिलिंद कांबळे यांनीही हजेरी लावली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या