कालाय तस्मै नम:

Pali Hill
कालाय तस्मै नम:
कालाय तस्मै नम:
कालाय तस्मै नम:
See all
मुंबई  -  

मुंबई - राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदी राहिलेल्या छगन भुजबळांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटक झाल्यानंतर तुरूंगातला पांढरी शुभ्र दाढी वाढलेला फोटो माध्यमांमध्ये झळकला आणि सामान्यांइतकंच महाराष्ट्राचं राजकीय विश्व अचंबित झालं होतं. भुजबळांचा आक्रमकपणा पूर्णपणे ओसरल्याची ती पहिली खूण होती. आता बुधवारी व्हायरल झालेल्या जे. जे. हॉस्पिटलमधील फोटोतून तर भुजबळांचा आक्रमकपणा दूरच पण त्यांचा दराराही संपल्याचे दिसत होते. काही वर्षांपूर्वी ज्या खाकी वर्दीला त्यांना सलाम ठोकावा लागत होता, त्या पोलिसांनाही त्यांची दखल घेईनासे वाटत असल्याचे या फोटोतून समोर येत आहे. एकेकाळच्या गृहमंत्र्याची ही अवस्था पाहून त्यांच्या समर्थकांना काहीही वाटत असले तरी नियती आणि कर्म राजाचा फकिर कसे करते, हेच यातून दिसते, अशी चर्चा सोशल मीडियात रंगली आहे. या फोटोत भुजबळ समोरून जात असताना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांपैकी एक पोलिस पेपर वाचत बसलेला दिसतो. तर दुसरा पोलिस खिशात हात घालून केवळ नजरेनेच भुजबळांवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

मार्च महिन्यापासून भुजबळ जामिनासाठी अर्ज करत आहेत. मात्र आजतागायत त्यांना जामीन मिळालेला नाही. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा भुजबळांना जामीन नाकारला. त्यामुळे जेजे हॉस्पिटलमध्ये आलेल्या भुजबळांना पुन्हा ऑर्थर रोड जेलची वाट धरावी लागली. अटकेनंतर सुरुवातीला काही काळ त्यांना पाठिंबा देणारे समपक्षीय आवाज नंतर मात्र थंडावले. ज्या शिवसेनेचे विरोधीपक्षनेते असताना भुजबळ विधानसभेत सत्ताधा-यांवर तुटून पडत, त्या शिवसेनेनं तर केव्हाच आपले हात वर केले आहेत. त्यामुळे भुजबळांना सध्या जणू दुहेरी शिक्षा भोगावी लागत आहे. एकीकडे कठोर तुरूंगवास तर दुसरीकडे राजकीय विजनवास !

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.