हा कार्यक्रम सरकारचाच - आमदार सुनील शिंदे

 Pali Hill
हा कार्यक्रम सरकारचाच - आमदार सुनील शिंदे

मुंबई - मातोश्रीवर शिवसेना आमदार आणि विभागप्रमुखांची शुक्रवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र ही बैठक नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवेसनेच्या नव्या नगराध्यक्षांच्या संदर्भात असल्याची माहिती राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. शनिवारी शिवस्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित राहतील अशी माहिती आमदार सुनील शिंदे यांनी दिलीय. शिवसेना जिथे तिथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तसेच भाजपासाठी हा कार्यक्रम नवीन असेल पण असे कार्यक्रम शिवसनेसाठी नवीन नसल्याची प्रतिक्रीया ही त्यांनी दिली. तसेच भाजपानं कार्यक्रम हायजॅक केला असं सगळ्यांना वाटत असलं तरी हा कार्यक्रम सरकारचाच असल्याचीही प्रतिक्रीया सुनील शिंदे यांनी दिली.

Loading Comments