संजय निरुपम यांची राज ठाकरेंवर टीका

  Andheri
  संजय निरुपम यांची राज ठाकरेंवर टीका
  मुंबई  -  

  अंधेरी - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय. 'रईस' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या परवानगीसाठी शाहरुख खान राज ठाकरे यांच्या भेटीला गेला होता. चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी राज ठाकरेंकडे मागायला राज ठाकरे असे आहेत तरी कोण? असा प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला. राज ठाकरे हे काय समांतर सरकार चालवत आहेत का? याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.

  'माय नेम ईज खान'च्या वेळी शिवसेनेनं विरोध केला होता. त्यावेळी आमच्या सरकारनं हा चित्रपट प्रदर्शित करू दिला. कायदा आणि सुव्यवस्थाची जबाबदारी ही सरकारची आहे. देशभक्तीच्या नावाखाली काही लोकांची हप्ते खोरी सुरू आहे. या गोष्टीला भाजपा सरकारचंही अभय आहे, असा आरोपही निरुपम यांनी केला.

  राज ठाकरे यांना कोण भेटायला गेलं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र हप्ते वसुली करणाऱ्यांना आमच्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही, असं निरुपम यांनी स्पष्ट केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.