स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी

 Madh Island
स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी

मढ - मालाडच्या मढमधील वॉर्ड क्रमांक 29 नव्यानं वॉर्ड क्रमांक 49 झालाय. सध्या येथे शिवसेनेचे नगरसेवक अजित भंडारी विद्यमान नगरसेवक आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागात काँग्रेसनंही पाय रोवलेत. मात्र वर्षानुवर्षं काँग्रेससाठी काम करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून नवीन उमेदवारांना पुढे केले जात असल्यानं, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

मढ आता महिला आरक्षित वॉर्ड असून येथून स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्या संगीता कोळी यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. मात्र नेतृत्वाकडून समिदा शेख यांना पुढे केलं जातंय. या वॉर्डमध्ये मालाडच्या तालुकाध्यक्ष विशाखा पाठक यांनीही दावा केलाय, मात्र या सर्वांना स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध अाहे. स्थानिक महिला कार्यकर्त्यांनांच प्राधान्य मिळावं, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. याबाबत काँग्रेसचे वरिष्ठ मात्र काहीही बोलण्यास तयार नाहीत. अजून मुलाखती व्हायच्या आहेत, पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील, असं त्यांच्याकडून सांगितलं जातंय.

Loading Comments