Advertisement

काम करेल त्याला मत, नाहीतर नोटा!


SHARES

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या प्रचारात होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांनी कधीच पातळी सोडली आहे. भ्रष्ट्राचाराच्या मुद्यावर राजकीय चिखलफेक सुरू आहे. हा सगळा प्रकार मताचे दान आपल्या पारड्यात कसे पडेल यासाठीच सर्व राजकीय पक्षांकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात जे मतदान करणार आहेत त्या मतदार राजाला नेमकं काय वाटतय?, तो यांच्या भाषणबाजीने प्रभावित होऊन मतदान करणार आहे का? अशा काही प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न ‘मुंबई लाइव्ह’ने केला. यावेळी अनेकांनी काम करणाऱ्यांनाच मतदान करणार असल्याचे सांगितले आहे. काही जणांनी नाही म्हटले तरी आश्वासनांच्या घोषणाबाजीचा प्रभाव मतदारांवर पडतोच हे मान्यही केले आहे. तर काहीजण हे सगळेच राजकारणी भ्रष्ट्राचारी आहेत त्यामुळे आम्ही नोटा वापरणार असे सांगितले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement