माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांकडून शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Shiv Sena Symbol)गेले आहे. शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले आहे. आता दादरमधील शिवसेना भवन आणि सामना, मार्मिक यांची मालकी कोणाकडे जाणार? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
शिवसेना भवन कोणाचे?
शिवसेनेचे दादर (Dadar)मधील सेना भवन (Shiv Snea Bhavan) यावर पक्षाची मालकी नाही. हे भवन शिवाई ट्रस्टच्या मालकीचे आहे. शिवाई ट्रस्टचे अध्यक्ष लीलाधर डाके आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत. तसेच इतर ट्रस्टीही उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील आहे. यामुळे पक्ष आणि चिन्ह गेले तरी शिवाई ट्रस्ट म्हणजेच शिवसेना भवन उद्धव ठाकरे यांचे राहणार आहे.
सामना अन् मार्मिकचे काय होणार?
सामना हे दैनिक आणि मार्मिक शिवसेनेची मुखपत्रे आहेत. आता हे कोणाच्या ताब्यात राहणार, हा प्रश्न आहे. परंतु सामना आणि मार्मिक यांच्यांवर प्रबोधन प्रकाशन या संस्थेची मालकी आहे. प्रबोधन प्रकाशन ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ही कंपनी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात आहे. यामुळे सामना आणि मार्मिक उद्धव ठाकरे यांच्यांकडेच राहणार आहे.
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून विधान भवनातील शिवसेना कार्यालयावर ताबा मिळवला आहे. तसेच संसदेतील शिवसेना कार्यालयावर देखील ताबा मिळवला आहे. त्यानंतर शिंदे गट शिवसेना भवनावर ताबा मिळवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा