Advertisement

उद्या मुंबईत येणार - एकनाथ शिंदे


उद्या मुंबईत येणार  - एकनाथ शिंदे
SHARES

उद्या, गुरुवारी एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांसह मुंबईत पोहोचणार आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. ते कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले असताना त्यांनी माध्यमांना माहिती दिली. तसंच उद्याच विधानसभेत बहुमत चाचणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातल्या राजकारणात भाजपने एन्ट्री घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर तिकडे गुवाहाटीमध्येही एकनाथ शिंदे गटाची बैठक पार पडली.

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. या संपूर्ण राजकीय पेचात आता राज्यपाल केंद्रस्थानी आले असून त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. 

सोमवारी एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेनेतच, शिवसेनेला पुढे घेऊन जात आहोत, यात काहीच शंका नाही.हेही वाचा

शिवसेनेला डोंबिवलीतून धक्का! 14 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सरकार अल्पमतात, बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत; भाजपची मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा