Advertisement

शिवसेनेला डोंबिवलीतून धक्का! 14 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत राजीनामा नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे.

शिवसेनेला डोंबिवलीतून धक्का! 14 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
SHARES

डोंबिवलीतील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह 14 शिवसेना आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे डोंबिवली शिवसेनेला खिंडार पडले आहे.

डोंबिवलीतील शिवसेनेचा महत्वाचा केंद्रबिंदू असलेल्या मध्यवर्ती शिवसेना शाखेत उध्दव ठाकरे यांच्या सोबत लावलेले बंडखोर नेते एकनाथ शिंदे खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या तसबिरी शिवसेना महिला आघाडीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सोमवारी आक्रमक होऊन काढल्या.

ही माहिती मिळताच शिंदे समर्थक उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शाखेते पोहचले. त्यावेळी त्यांना उपस्थित सेना पदाधिकारी, कार्यकत्यांनी शाखेत येण्यापासून रोखले. त्यावरून शिंदे समर्थक आणि उध्दव समर्थक गटात बाचाबाची झाली. ही माहिती शिंदे समर्थक नगरसेवक महेश पाटील यांना समजताच त्यांचे कार्यकर्ते संजय राऊत यांचा पुतळा दहन करून शाखेत आले. 

शाखेतील शिंदे पिता पुत्रांच्या तसबिरी काढल्याने शिवसेनेतील शिंदे समर्थक कमालीचे नाराज होते. ज्या शाखेत निष्ठेने २५-३० वर्ष शाखेत शिवसैनिक म्हणून वावरलो त्याच शाखेत प्रवेश मिळत नसेल तर शिवसैनिक म्हणून घेण्यात काय अर्थ असा विचार करून शिंदे गटातील १५ सदस्यांनी मंगळवारी तडकाफडकी शिवसेना पक्ष पदाचे राजीनामे दिले.

दरम्यान, ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी राजीनामा दिला आहे. त्यांतर आता डोंबिवलीतील 14 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आल्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा