• 'आय लव्ह यू कसं बोलायचं?'
SHARE

माटुंगा - ज्यांना माझ्या नेतृत्त्वावर विश्वास नसेल, त्यांनी बेधडक दुसरी वाट पकडावी. मी निष्ठावंतांना घेऊन पुढे जाईन, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. सोमवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या ‘शिवसेना 50 वर्षांची घौडदौड’ या ऑडिओ बुकच्या अनावरण सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं.

उद्धव यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीसंदर्भात येत्या 26 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही संकेत या वेळी दिले. पण आय लव्ह यू कसे बोलायचे हेच कळत नाही, असा खोचक टोमणाही उद्धव यांनी लगावला. "आपण सध्या कुंपणावर आहोत. त्यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत शांत राहिलेलं बरं," असं सांगत उद्धव यांनी शिवसैनिकांना तूर्तास संयम बाळगण्याचा सल्ला दिला. "आपण एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत. या टप्प्यावर मराठी माणसाने एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. जल्लीकट्टूसाठी तामिळनाडूतल्या जनतेने एकजूट दाखवली. तशाच एकजुटीने आपण लढलो नाही तर आपले तुकडे केले जातील," असेही उद्धव यावेळी म्हणाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या